Breaking News

सातारा जिल्ह्यात 275 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

        सातारा दि. 29  -:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 275 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 464 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

464 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 53, कराड येथील 18, फलटण येथील 22, कोरेगाव येथील 31, वाई येथील 15, खंडाळा येथील 19, रायगाव येथील 39, पानमळेवाडी येथील 70, मायणी 7, महाबळेश्वर येथील 21, दहिवडी 3, खावली 70, म्हसवड 14, पिंपोडा 7 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 75 असे एकूण 464 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 185268

एकूण बाधित -- 46023

घरी सोडण्यात आलेले -41047

मृत्यू -- 1528

उपचारार्थ रुग्ण -- 3448

No comments