Breaking News

सातारा जिल्ह्यात 325 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

.

325 corona patients discharged today in Satara district
     सातारा दि. 24-: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 325 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 265 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 265 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 21, कराड येथील 16, फलटण येथील 19, कोरेगाव येथील 22,  वाई येथील 16, खंडाळा येथील 23, रायगाव येथील 19, पानमळेवाडी येथील 4, महाबळेश्वर येथील 16, दहिवडी येथील 15, खावली येथील 3, म्हसवड 8, पिंपोडा येथील 6 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 77 असे एकूण 265 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 179258
एकूण बाधित -- 45070
घरी सोडण्यात आलेले -- 38986
मृत्यू -- 1492
उपचारार्थ रुग्ण -- 4592


No comments