Breaking News

सातारा जिल्ह्यात 333 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

333 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 30 -:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 333 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 300 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

300 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, , फलटण येथील 28, वाई येथील 13 खंडाळा येथील 10, रायगाव येथील 40, पानमळेवाडी येथील 16, महाबळेश्वर येथील 7, खावली 133, तळमावले येथील 35,असे एकूण 300 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 187310

एकूण बाधित -- 46219

घरी सोडण्यात आलेले -41380

मृत्यू -- 1536

उपचारार्थ रुग्ण -- 3303

No comments