Breaking News

सातारा जिल्ह्यात 393 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज ; 317 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        सातारा दि. 31 -:  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 393 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 317 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 317 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 27,कराड येथील 25  कोरेगाव येथील 38, वाई येथील 42, खंडाळा येथील 28, रायगाव येथील 31, पानमळेवाडी येथील 9, मायणी येथील 12, महाबळेश्व येथील 26, दहीवडी येथील 23,म्हसवड येथील 3, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 53,असे एकूण 317 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 188789

एकूण बाधित -- 46375

घरी सोडण्यात आलेले -41773

मृत्यू -- 1547

उपचारार्थ रुग्ण -- 3055

No comments