सातारा जिल्ह्यात 535 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

सातारा दि. 26 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 535 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 363 नागरिकांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 37, कराड येथील 14, फलटण येथील 18, कोरेगाव येथील 28, वाई येथील 20, खंडाळा येथील 53, रायगाव येथील 41, पानमळेवाडी येथील 11, मायणी येथील 7, महाबळेश्वर येथील 5, पाटण येथील 9, दहिवडी येथील 14, खावली येथील 6, तळमावले येथील 17, म्हसवड 18, कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 65 असे एकूण 363 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने -180568
एकूण बाधित --45373
घरी सोडण्यात आलेले --39692
मृत्यू --1503
उपचारार्थ रुग्ण-4178
No comments