Breaking News

सातारा जिल्ह्यात 555 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज

555 corona patients discharged today in Satara district

        सातारा दि. 28 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 555 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 316 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 316 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

        स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 14, कराड येथील 13, फलटण येथील 14, कोरेगाव येथील 34,  वाई येथील 16, खंडाळा येथील 19, रायगाव येथील 31, पानमळेवाडी येथील 36, मायणी येथील 8, महाबळेश्वर येथील 20, पाटण येथील 29, खावली येथील 23, तळमावले येथील 6 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथे 53 असे एकूण 316 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

घेतलेले एकूण नमुने – 183385

एकूण बाधित -- 45790

घरी सोडण्यात आलेले -- 40772

मृत्यू -- 1518

उपचारार्थ रुग्ण -- 3500

No comments