दिव्यांग संशोधन समितीच्या पुनर्गठनासाठी व्यक्ती व संस्थांना आवाहन

मुंबई, दि. २७ : दिव्यांगाबाबतचे राज्य सल्लागार मंडळ व दिव्यांग संशोधन समितीची स्थापना करण्याच्या दृष्टीने, मंडळ/समित्यांचे पुनर्गठन करण्याकरिता दिव्यांग कल्याण क्षेत्रात कार्यरत व तज्ज्ञ व्यक्ती, दिव्यांग व्यक्ती व दिव्यांगांच्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधीत्व करणारे दिव्यांग पदाधिकारी व सदस्य यांचे नियुक्तीकरिता प्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
महाराष्ट्र राज्य सल्लागार मंडळाकरिता दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या कलम ६६ उपकलम २ (इ) अन्वये नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक तसेच त्यांची संक्षिप्त माहिती, थोडक्यात वैयक्तिक माहिती व उल्लेखनिय कामगिरीची माहिती देण्यात यावी. माहिती थोडक्यात मराठी / इंग्रजीमध्ये देवून DVB-TT surekh या ism font मध्ये पेन ड्राईव्ह मध्ये अथवा ई-मेल acswomumbaisub@gmail.com मध्ये सॉफ्ट कॉपी पाठवावी व याबरोबर हार्ड कॉपी ०३ प्रतीत सादर करण्यात यावी.
दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ मधील उपकलम २ (२) अन्वये दिव्यांगत्वावर संशोधन करण्याकरिता गठीत करावयाच्या संशोधन समितीवर नियुक्तीकरिता सदस्यांची नावे, पत्ता, भ्रमणध्वनी क्र. तसेच त्यांची संक्षिप्त थोडक्यात वैयक्तिक माहिती व उल्लेखनीय कामगिरीची माहिती देण्यात यावी. (माहिती थोडक्यात मराठी/इंग्रजी मध्ये देवून DVB-TT surekh या ism font मध्ये पेन ड्राईव्ह मध्ये अथवा ई-मेल acswomumbaisub@gmail.com मध्ये सॉफट कॉपी पाठवावी व याबरोबर हार्ड कॉपी ०३ प्रतीत कार्यालयात सादर करण्यात यावी.
प्रस्ताव दि. २९.१०.२०२० पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण, मुंबई उपनगर या कार्यालयात संक्षिप्त माहितीसह तीन प्रतीमध्ये कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येतील, असे सहायक आयुक्त समाजकल्याण, मुंबई उपनगर यांनी कळविले आहे.
No comments