Breaking News

सातारच्या नटराज मंदिरात नवरात्रीनिमित्त कणसे भगिनींचे भरतनाट्यम सादर

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात बहारदार भरतनाट्यम सादर करताना कणसे भगिनी -फोटो अतुल देशपांडे
       सातारा  (गंधवार्ता वृत्तसेवा) - सातारा येथील श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात यावर्षी नवरात्रीचे धार्मिक कार्यक्रम केवळ ब्रह्मवृंदकडून सुरू आहेत. स्थानिक भक्तांना दर्शनासाठी मंदिर बंद ठेवण्यात आले आहे . नुकतेच पंचमी दिवशी नवचंडी हवंन संपन्न झाले .
नटराज मंदिरात नटराज मंदिराचे गाभार्‍या पुढे नवरात्रीनिमित्त कर्नाटकातील कुमठा येथे बनवलेली आकर्षक सरस्वती देवीची लाकडी कोरीव काम केलेली मूर्ती विशेष लक्ष वेधून घेणारी ठरत आहे.
        सध्या मंदिरांमध्ये उमादेवी विविध पूजा बांधण्यात येत आहेत. दरम्यान ,सातारा येथील कणसे परिवारातील तीन भगिनींनी नटराज मंदिरातील सभामंडपात अनुष्का, आकांक्षा,आणि अपूर्वा या तीन भगिनींनी अतिशय बहारदार भरतनाट्यम सादर केले. यावेळी सामाजिक अंतर ठेवून कणसे परिवारातील सदस्य आणि मंदिराचे व्यवस्थापकीय विश्वस्त रमेश शानभाग,सौ. उषा शानभाग मंदिराचे विश्वस्त श्री .नारायणराव, मंदिराचे व्यवस्थापक श्री .चंद्रन उपस्थित होते. नृत्य विशारद . नृत्य प्रवेशिका यासारख्या परीक्षा संपूर्ण केलेल्या या तिन भगिनींनी अतिशय बहारदार नृत्य सादर करून देवापुढे ही नवरात्रीनिमित्त सेवा सादर केलीशरीराच्याअतिशय लयबद्ध हालचाली आणि नृत्यातील रचनेवर असलेले प्रसंग अतिशय सुरेख अभिनयातून सादर करीत आपल्या शारीरिक लवचिकतेचा प्रत्यय यावेळी नृत्यातून या तिन्ही बहिणींनी देवापुढे सादर केला.

No comments