Breaking News

महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपुनजन

Bhumipunjan of Maharaja Pratapsinh Malojirao Multi Specialty Hospital at Phaltan
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन युवा नेते व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते  करण्यात आले. महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल हे बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांचा एक महत्वाकांक्षी प्रकल्प असून नावाला साजेसेच काम हॉस्पिटलच्या माध्यमातून करण्यात येईल, अशी खात्री श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

        दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर युवा नेते व पंचायत समिती सदस्य श्रीमंत विश्वजितराजे रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांच्या शुभ हस्ते महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन संपन्न झाले. या वेळी बाजार समितीचे सचिव शंकरराव सोनवलकर व संपूर्ण बाजार समितीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

        कृषी उत्पन्न बाजार समिती फलटणच्या अंतर्गत शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना कार्यरत आहेत. माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे सुप्रीमो खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व संपूर्ण बाजार समितीचे संचालक मंडळ गेले काही वर्ष कार्यरत आहे. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी सभापती पदाचा पदभार स्वीकारल्यापासून शेतकऱ्यांच्या हिताच्या अनेक योजना बाजार समितीच्या माध्यमातून साकारल्या आहेत. त्या मधीलच एक असलेले महाराजा प्रतापसिंह मालोजीराव मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलचे भूमिपूजन नुकतेच संपन्न झाले.

No comments