Breaking News

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह

Deputy Chief Minister Ajit Pawar's corona test positive

            गंधवार्ता वृत्तसेवा (दि 26 ऑक्टोबर 2020) - राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वतः  होम क्वारंटाईन झाले होते.  दरम्यान त्यांनी स्वतःची covid-19 ची चाचणी करून घेतली, ती चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती स्वतः उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सध्या प्रकृती उत्तम असून डॉक्‍टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅण्डी रुग्णालयात दाखल असल्याचेही उपमुख्यमंत्री यांनी कळवले आहे.

        उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली असून प्रकृती उत्तम आहे. सावधतेचा उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने ब्रीच कॅन्डी रुग्णालयात दाखल झालो आहे.

        राज्यातील नागरिक, राष्ट्रवादी काँग्रेसह राज्यातील सर्व राजकीय पक्षांचे नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते यांना विनंती आहे की, काळजी करण्याचं काहीही कारण नाही. माझी प्रकृती उत्तम असून थोड्या विश्रांतीनंतर मी लवकरच आपल्यासोबत पुन्हा कार्यरत होईन.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सामाजिक सुरक्षिततेच्या कारणास्तव स्वत:ला गृहविलगीकरण केले असले तरी ‘देवगिरी’ या शासकीय निवासस्थानातून त्यांचे कार्यालयीन कामकाज नियमित सुरु होते.  दरम्यान  कोरोनाची चाचणी केली असता, ती चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. सध्या त्यांची प्रकृती उत्तम असून, पुढील उपचार ब्रीच कॅण्डी रुग्णालयात सुरू आहेत. 

No comments