Breaking News

खा. रणजीतसिंह यांनी केली ऊसतोड मजुरांच्या मुलांची आस्थेने विचारपूस

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - माढा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज मतदार संघात फिरत असताना ऊसतोड मजुरांच्या मुलांमध्ये बसून त्यांची मायेने विचारपुस करून त्यांना खाऊचे वाटप केले.

        कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर  नियमांचे पालन करत  कारखाने  सुरु होऊन, गाळप सुरू झाल्याने  ऊसतोड मजूर  टोळ्या  फलटण तालुक्यात व माढा मतदारसंघात आले आहेत. ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता काम करत असणाऱ्या या ऊस तोड मजुरांची खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी उसाच्या फडात जाऊन भेट घेतली व चौकशी केली, त्यावेळी त्यांचे लहान लहान मुलांची आस्थेने चौकशी व विचारपूस करून त्यांना अल्पोपहार खाऊ घातला. त्यावेळी ऊसतोड मजुर भारावुन गेले...त्या लहानशा मुलांना तर खूप आनंद वाटला.



No comments