Breaking News

सोन्या - चांदीची तस्करी : कोट्यवधींचा मुद्देमाल जप्त ; बोरगाव पोलीसांची कामगिरी

        सातारा दि. 24 ऑक्टोबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - 591 किलो चांदीचे दागिने व वस्तू तसेच 19 तोळे सोन्याचे दागिने असा सुमारे 3 कोटी 64 लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल अवैधरित्या ट्रॅव्हल बसमधून वाहतूक करत असताना, बोरगाव, सातारा पोलिसांनी मोठ्या शिताफीने ट्रॅव्हल बस ताब्यात घेऊन, जप्त केला असून या तस्करी प्रकरणी कोल्हापूर येथील तिघा जणांना ताब्यात घेतले आहे. 

        बोरगाव, सातारा पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 23 ऑक्टोबर 2020 रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर वाघ यांना गोपनिय महिती मिळली की,  कार्तिक ट्रॅव्हल एम.एच.०९ सी.व्ही. ११७९ मधुन अवैधरित्या चांदीची वाहतुक केली जात आहे. अशी माहिती मिळाल्याने सदर बातमीच्या अनुशंगाने ट्रॅव्हल चेक करण्या करीता, पोलीस अंमलदार यांना सूचना देवुन, मौजे नागठाणे ता.जी. सातारा येथे कराड ते सातारा जाणाऱ्या लेनवर नाकाबंदी चालु असताना, रात्री. ०१.३० वाजण्याच्या सुमारास कार्तिक ट्रॅव्हल एम.एच.०९ सी.व्ही. ११७९ ही आली असता, तीस थांबवून काही अवैध वस्तु वाहतुक होत असल्यामुळे, ट्रॅव्हल  चेक करीत असलेबाबत सर्व प्रवाशी व ड्रायव्हर क्लिनर याना सांगितले. त्यानंतर ट्रॅव्हल मधील प्रवाशी बसतात तेथे चेक केले असता, काही संशयित असे आढळून आले नाही. त्यानंतर ट्रॅव्हलच्या बाहेर येऊन बसच्या क्लीनरला बसची साईड डिकी उडायला सांगून, त्यामध्ये चेक केले असता एक काळ्या रंगाची बॅग मिळाली, त्या बॅगमध्ये चांदी सारख्या दिसणाऱ्या विविध वस्तू बॅगमध्ये मिळून आल्या, तसेच ट्रॅव्हलच्या पाठीमागील डिकीत उघडून पाहिले असता, त्यामध्ये पांढऱ्या गोनीमध्ये पुन्हा चांदीसारख्या दिसणाऱ्या वस्तू मिळून आल्या. सदर मालाच्या पावती बाबत चालक व क्लिनर कडे मागणी केली असता त्यांनी ती नसल्याचे सांगितले. सदरच्या वस्तू कोणी ठेवल्या याबाबत चौकशी केली असता, त्यावेळी ट्रॅव्हल चालक याने,  सोनसिंग परमार, अमोल भोसले, मनोजकुमार परमार या व्यक्तींची नावे सांगितली. सदर मुद्देमालाचे मालक यांना बोलावून घेऊन, त्यांना ठेवलेल्या चांदीच्या वस्तू बाबत विचारणा केली असता, त्या वस्तू त्यांच्याच असल्याच्या त्यानी कबूल केले. त्यावेळी त्यांना सदर वस्तूच्या पावत्या बद्दल  विचारले असता, त्यांना समाधानकारक उत्तरे देता आली नाहीत, त्यामुळे सदर मुद्देमाला हा चोरीचा असल्याबाबत शंका आल्याने, सदर ट्रॅव्हल पोलीस ठाणे आवारात आणून, गाडीमध्ये असलेल्या खालील  वर्णनाचा मुद्देमाल सोनसिंग मुरारीसिंग परमार सध्या राहणार कासार गल्ली, कोल्हापूर,  अमोल प्रल्हाद भोसले सध्या राहणार गुजरी, कोल्हापूर, मनोजकुमार परमार सध्या राहणार कसबा चौक, जैन वस्ती, कोल्हापूर यांच्या समक्ष जप्त केल्या.

        यामध्ये 3 कोटी 54 लाख 76 हजार 800 रुपये किमतीचे एकूण 591 किलो 280 ग्रॅम वजनाच्या चांदी सारखे दिसणारे दागिने, नऊ लाख 37 हजार तीनशे रुपये किमतीचे एकूण 19 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने तसेच 0 रुपये किमतीचे 2 किलो 190 ग्रॅम वजनाचा सोन्या सारखा दिसणारा धातू असे एकूण 3 कोटी 64 लाख 14 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे.

        सदरचा मुद्देमाल जप्त करुन सी.आर.पी.सी.१०२ प्रमाणे कारवाई करुन मा.प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी सातारा यांना पाठविला आहे.
        सदरची कारवाई अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक सातारा,  धिरज पाटील अपर पोलीस अधीक्षक,सातारा, आचल दलाल, सहाय्यक पोलीस अधीक्षक सातारा यांचे मार्गदर्शनाखाली डॉ.सागर वाघ सहायक पोलीस निरीक्षक, पो.हे.कॉ.मनोहर सुर्वे,सुनिल जाधव,पो.कॉ किरण निकम, विजय साळुंखे, विशाल जाधव, प्रकाश वाघ,  राहुल भोये उत्तम गायकवाड,चालक पवार यांनी केली आहे. 

No comments