Breaking News

सुरवडी तेथे घरफोडी करणाऱ्या चोरट्यास नागरिकांनी पाठलाग करून पकडले

The burglar was caught by the citizens at Surwadi

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा)  दि. 23 ऑक्टोबर 2020  - गोल्डन सिटी सुरवडी येथे घरफोडी करण्याच्या प्रयत्नात असणाऱ्या दोघांना तेथील रहिवासी सचिन शिंदे व उमेश जगताप यांनी आडवले, ते पळून जात असताना त्यांचा पाठलाग करून त्यापैकी एकास पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले व होणारी घरफोडी रोखली. सचिन शिंदे व उमेश जगताप यांनी दाखवलेले धाडस हे कोतुकास्पद असून, त्यामुळे होणारी घरफोडी रोखली गेली आहे.

         दि. 22 ऑक्टोबर 2020 रोजी रात्रौ 11.30 वाचे सुमारास सचिन महिपती शिंदे हे कमिन्स कंपनी ऑफिसमधील काम आटपून गोल्डन सिटी सुरवडी येथे फ्लॅट च्या खाली गाड़ी पार्किंग करुन, रुम मध्ये गेले तर घरामध्ये नळास पाणी नसल्याने, ते पुन्हा खाली टाकीचा कॉक चालु करण्यासाठी टाकीजवळ गेले. कॉक चालु केल्यानंतर त्यांना गोल्डन सिटी येथील गजाजन रणवरे यांचे फ्लॅटचे किचनच्या गॅलरीमध्ये दोन अनोळखी इसम असून ते  किचनची खिड़की उचकटत असल्याचे दिसले. त्यावेळी सचिन शिंदे यांनी त्याना आवाज देऊन, कोण आहे, असे विचारले. तेव्हा त्यांनी तेथुन खाली उडी टाकुन पळण्याचा प्रयत्न केला. तेव्हा सचिन यांनी त्यांचा मित्र उमेश जगताप यांना हाक मारली, ते आल्यानंतर त्यांनी त्या चोरट्यांचा पाठलाग केला परंतु त्यातील एकाने त्याचेकडील असलेली काचेची बाटली फोडुन सचिन यांना धाक दाखविला.  त्यावेळी त्याच्या बरोबर असलेला त्याचा साथीदार तारेच्या कंपाऊंड मधुन उडी मारुन पळुन जात होता. तो तारेच्या कंपाऊंड जवळ असताना सचिन शिंदे व उमेश जगताप या  दोघांनी  पाठलाग करून  त्यास पकडले. त्यानंतर सचीन व उमेश यांनी गोल्डन सिटी मधील इतर नागरिकांना आवाज देऊन उठवले. व नंतर पोलिसांना बोलवून चोरट्यास पोलिसांच्या ताब्यात दिले. 
 
        पकडलेली व्यक्ती ही  कौश्या सुधाकर भोसले रा. वाखरी असून त्याने व त्याच्या साथीदाराने  गजाजन रणवरे यांच्या फ्लॅटमधील राहणारे भाडेकरु ईश्वर नारायण वाघ यांच्या घराच्या  खिड़कीची स्लाडिंगचे लॉक तोडून घरफोडी  करण्याचा प्रयत्न केला असल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

No comments