Breaking News

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.८५ टक्के

Corona recovery rate in the state is 89.85%

राज्यात  आज ८,२४१ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत.  राज्यात आजपर्यंत एकूण १५,०३,०५० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.८५  टक्के एवढे झाले आहे.
आज राज्यात ६,१९० नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. 
राज्यात आज १२७ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६२ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८९,०६,८२६ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,७२,८५८ (१८.७८ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५,२९,४६२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १२,४११ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज रोजी एकूण १,२५,४१८ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. 

No comments