Breaking News

विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांना कोरोना

        गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 24 ऑक्टोबर 2020) - राज्याचे माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस यांची  कोरोनाची टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे.   देवेन्द्र फडणवीस यांनी करोनाची चाचणी केली होती, आज दुपारी त्यांचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर देवेन्द्र फडणवीस  यांनी स्वत: ट्विटर वर ही माहिती देऊन,  माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे. माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन त्यांनी केलं आहे.
       विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस  यांनी  आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, अशी परमेश्वराची इच्छा असावी.
माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी स्वतःला आयसोलेट केले आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार औषधोपचार घेतो आहे.
माझ्या संपर्कात आलेल्यांनी स्वतःची चाचणी करून घ्यावी. 
सर्वांनी स्वतःची काळजी घ्यावी !
 दी. 18 व 21 ऑक्टोबर दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेन्द्र फडणवीस हे  बारामती, माढा, पंढरपूर, सोलापूर, उस्मानाबाद भागात अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या भागात पाहणी  दौर्‍यावर होते.  

No comments