Breaking News

फलटण शहर 20, ग्रामीण 7 कोरोना पॉझिटिव्ह तर 2 मृत्यू

Corona virus phaltan updates : 2 diad  and 27 corona positive 

 फलटण तालुक्यात 27 कोरोना पॉझिटिव्ह तर  युवकासह वृद्धेचा मृत्यू  

        फलटण दि. 30 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 30 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 27 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत.  आज ग्रामीण भागापेक्षा शहरातील कोरोना बधितांचा आकडा वाढला आहे. यामध्ये शहरात  20 व्यक्ती तर ग्रामीण भागात 7 रुग्ण सापडले आहेत. तर 2 व्यक्ती मृत पावल्या आहेत.  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 20 कोरोना पॉझिटिव्ह
यामध्ये बुधवार पेठ 8, लक्ष्मीनगर 5, मंगळवार पेठ 2, मलठन 2, रिंगरोड 1, गजानन चौक 2  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 7 कोरोना पॉझिटिव्ह 
 यामध्ये कापशी 1,ढवळेवाडी 1,आळजापूर 1,साखरवाडी 2, नवारस्ता 1,बीरदेवनगर 1  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

2 रुग्णाचा मृत्यू
कापशी  ता. फलटण येथील 58 वर्षीय महिला, हनुमंतवाडी ता. फलटण येथील 27 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments