Breaking News

फलटण तालुक्यात 16 कोरोना पॉझिटिव्ह तर 3 मृत्यू

Corona virus phaltan updates : 3 diad  and 16 corona positive 

        फलटण दि. 24 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - जिल्हा प्रशासनाकडून आज 24 ऑक्टोबर 2020 रोजी जाहीर केलेल्या अहवालानुसार, फलटण तालुक्यात आज 16 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. यामध्ये शहरात  4 व्यक्ती तर ग्रामीण भागात 12 रुग्ण सापडले आहेत. तर 3 व्यक्ती मृत पावल्या आहेत.  असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.  

फलटण शहरात 4 कोरोना पॉझिटिव्ह
        यामध्ये फलटण 1, लक्ष्मीनगर 3 व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. 

 ग्रामीण भागात 12 कोरोना पॉझिटिव्ह 
         यामध्ये कोळकी 1, राजुरी 1, कापशी 2, हिंगणगांव 2, खराडेवाडी 1,  विडणी 1, निरगुडी 1,  काळज 2, तरडगांव 1  व्यक्तींच्या कोविड चाचण्या पॉझिटिव्ह आल्या असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी गंधवार्ताला दिली आहे.

3 रुग्णाचा मृत्यू
        तरडगाव ता. फलटण येथील 70 व 92 वर्षीय पुरुष, निंबाळक ता. फलटण येथील 55 वर्षीय पुरुष या कोरोना बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

No comments