Breaking News

सातारा जिल्ह्यात 113 कोरोना बाधित ; 6 बाधितांचा मृत्यु

            Corona virus Satara District updates :  6 died and 113 corona positive
        सातारा दि.26 -: जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 113 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  6 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.

कोराना बाधित अहवालामध्ये 

 सातारा तालुक्यातील सातारा 13, मंगळावार पेठ 5, शनिवार पेठ 1,  करंजे पेठ 3, केसरकर पेठ 1, यादोगोपाळ पेठ 1,  गोडोली 1, पिरवाडी 1,  गोडोली 1, बोरखळ 1, मात्यापूर 1, खेड 2, तामजाईनगर 1, वळसे 1, गुजरवाडी 1, वाघोशी 1, लिंब 3, चिचनेर 1, विकासनगर 1, चिंचनेरवंदन 2,

 कराड तालुक्यातील कराड 1, उंब्रज 1, मलकापूर 3, तुळसण 1, शेरे 4, वाठार 3

फलटण तालुक्यातील गोळीबार मैदान 2,दलवाडी 3, तरडगांव 1, गिरवी 5, तडवळे 1, ढवळेवाडी 2,

वाई तालुक्यातील  सह्याद्रीनगर 1, सुरुर 1, चिंधवली 1,

महाबळेश्वर तालुक्यातील  गोडवली 2,

 खटाव तालुक्यातील खटाव 1, सिध्देश्वर कुरोली 1, पुसेगांव 3, वर्धनगड 5, निढळ 1, गारवडी 1, वर्धनगड 1,

 माण  तालुक्यातील  दिवड 1, माळवाडी 1, बिदाल 1,

 कोरेगाव तालुक्यातील  कोरेगांव 1, ल्हासुर्णे 1, रहिमतपूर 1, सोनके 1,

 जावली तालुक्यातील केडांबे 1, आंबेघर 1, केळघर 1, कुसुंबी 1, मेढा 1, सांगवी 1, आगलावेवाडी 7

इतर  आर्ले 1, खोळेवाडी 1,

बाहेरील जिल्ह्यातील  ठाणे 1, शेडगेवाडी(सांगली) 1,

6 बाधितांचा मृत्यु

         क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये  येळगाव ता. कराड येथील 65 वर्षीय महिला. जिल्हा कोविड रुग्णालय सातारा येथे डोकळवाडी ता. खटाव येथील 65 वर्षीय पुरुष, केसरकर पेठ सातारा येथील 72 वर्षीय महिला, खटाव येथील 63 वर्षीय पुरुष, रहितमपूर ता. कोरेगांव येथील 76 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये कुडाळ ता. जावली येथील 70 वर्षीय पुरुष अशा 6 एकूण   कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

 घेतलेले एकूण नमुने -180568

एकूण बाधित --45373  

घरी सोडण्यात आलेले --39157

No comments