Breaking News

सातारा जिल्ह्यात 230 कोरोना बाधित ; 9 बाधितांचा मृत्यु

Corona virus Satara District updates :  9 died and 230 corona positive

        सातारा दि.28  - जिल्ह्यात काल मंगळवारी  रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 230 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक   डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये
 सातारा तालुक्यातील सातारा 5,  मंगळवार पेठ 1, शनिवार पेठ 1, करंजे 2, गोडोली 2, कोडोली 4, विकासनगर 2, व्यंकटपुरा पेठ 1, डबेवाडी 1, वर्ये 1, अंबवडे 3, गोरखपुर 1, सासपडे 1, नागठाणे 3, अतित 2, नेले 2, मुनावळे 1, दौलतनगर सातारा 1, तामाजाईनगर सातारा 1, नांदल 1, संभाजीनगर सातारा 1, निनाम पाडळी 1, संगमनेर 1, देगाव 2, अंगापूर 1, जकातवाडी 1, माजगाव 1, कामाठीपुरा 1,

  कराड तालुक्यातील कराड 3, शुक्रवार पेठ 1, तळबीड 1,  वारुंजी 1, मलकापूर 1, अने 1, उंब्रज 2, मसूर 2, शेरे 1, बेलवडी 1, केसे 1, कालवडी 1, ओंढ 1, आगाशिवनगर 1, कासार शिंरंबे 1,    

 फलटण तालुक्यातील गजानन चौक 1, गोळीबार मैदान 3, सांगवी 1, बरड 1, जाधवाडी 2, कोळकी 1, सस्तेवाडी 1, नारळीबाग फलटण 1, कापशी 2, तरडगाव 2, साखरवाडी 2, फडतरवाडी 5, रविवार पेठ फलटण 2, राजाळे 1, वाठार निंबाळकर 2, ताथवडा 1.

 महाबळेश्वर तालुक्यातील पाचगणी 2, किनघर 1,  

 खटाव तालुक्यातील गारावडी 1, वेटणे 1, डिस्कळ 1,  पुसेगाव 7, ललगुण 1, सिद्धेश्वर कुरोली 1, धारपुडी 2, वडूज 6, पडळ 1, विखले 1, नागनाथवाडी 1, गारवडी 1, पेडगाव 1, तडवळे 1, सिंहगडवाडी 1, ढंबेवाडी 1, बुध 1, जायगाव 1, वारुड 1, कुराळे 1,

 माण  तालुक्यातील राणंद 1, बिदाल 2, दहिवडी 4, मलवडी 4, दिवाडी 2, मार्डी 1, शेवरी 2, मायणी 1,

खंडाळा तालुक्यातील खंडाळा 1, लोणंद 3, भादे 1, धनगरवाडी 1, अहिरे 2, शिरवळ 4, पाडेगाव 1, वाघोशी 6,

 कोरेगाव तालुक्यातील कोरेगाव 3,  वाठार स्टेशन 4, नांदगिरी 1, किन्हई 5, दहिगाव 10, करंजखोप 1, कळाशी 1, ल्हासुर्णे 1, साप 1,  कण्हेरखेड 3, रहिमतपूर 1, कुमठे 1.

 पाटण तालुक्यातील कुंभारवाडा 1, मारुल हवेली 2, बनपुरी 1, मल्हार पेठ 1,  

जावली तालुक्यातील खर्शी कुडाळ 5, सर्जापूर 2, घराटघर 4, गोजे 2, कुसुंबी 1,  भिवदी 1,
इतर कुरोली 1, वडगाव 2, पिंपरी 3,   मानगाव 1,
बाहेरील जिल्ह्यातील  येडेनिपाणी ता. वाळवा 1, कामेरी ता. वाळवा 1,

 9 बाधितांचा मृत्यु
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे उपचार घेत असलेल्यांमध्ये   गुरुवार पेठ , सातारा येथील 50 वर्षीय पुरुष, पिंपोडा ता. कोरेगाव येथील 90 वर्षीय महिला, खेड ता. कोरेगाव येथील 80 वर्षीय महिला, तसेच जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये बेलवडे बुद्रुक ता. कराड येथील 70 वर्षीय महिला, वाठार ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष, तसेच उशिरा कळविलेले नागझरी ता. सातारा येथील 73 वर्षीय पुरुष, कुमठे ता. कोरेगाव येथील 60 वर्षीय पुरुष, बिदाल ता. माण येथील 75 वर्षीय पुरुष, रेठरे बुद्रुक ता. कराड येथील 80 वर्षीय पुरुष अशा  एकूण  9  कोविड बाधितांचा  उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे.

घेतलेले एकूण नमुने -183385
एकूण बाधित --45790  
घरी सोडण्यात आलेले --40217  
मृत्यू -- 1518
उपचारार्थ रुग्ण-4055  


No comments