Breaking News

फलटण येथे युवकास तलवारीने मारहाण करून 20 हजारांची मागणी

        फलटण दि. 26 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - तू नेत्याचा पोरगा झाला म्हणजे, तू लई भाई झाला का, असे म्हणून युवकास शंकर मार्केट फलटण येथे तलवारीच्या सहाय्याने मारहाण करून, 20 हजार रुपयांची मागणी करून, जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी पोलिसांनी हत्तीखान्या जवळील एकावर गुन्हा दाखल केला आहे.

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पंकज अरुण आंबोले वय 24 वर्षे राहणार शंकर मार्केट जवळ भैरोबा गल्ली, फलटण हा दि. 24 ऑक्टोबर 2020 रोजी 5 ते 5:30 वाजण्याच्या दरम्यान  शंकर मार्केट येथे ब्राह्मण गल्ली येथे, चालत फोनवर बोलत असताना, शंकर मार्केट फलटण येथे अक्षय बाळासाहेब माने हा दारू पिऊन आला व फिर्यादी आंबोले यांना म्हणाला की, तू नेत्याचा पोरगा झाला म्हणजे, तू लई भाई झाला का? असे म्हणून आंबोले यास आई-बहिणीवरून शिवीगाळ केली, त्या ठिकाणी असणाऱ्या लोकांनी भांडण सोडवा सोडवी केल्यानंतर, दोन-तीन मिनिटांनी अक्षय माने हा परत हातात तलवार घेऊन आला व फिर्यादी आंबोले यास उलटी तलवार करून, कपाळावर मारली व म्हणाला की मला 20,000/- रुपये हप्ता दे, मी कोण आहे तुला माहित आहे का, असे म्हणून जीवे मारण्याची धमकी देऊन, निघून गेला असल्याची फिर्याद पंकज अरुण आंबोले यांनी दिली आहे.

गुन्ह्याचा पुढील तपास सपोनि राऊळ हे करीत आहे.

No comments