Breaking News

गोखळी येथे श्रीमंत रामराजे शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना

        गोखळी  (गंधवार्ता वृत्तसेवा) -   शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठी  श्रीमंत रामराजे शेतकरी उत्पादक कंपनीची  स्थापना करण्यात येत असल्याची माहीती कंपनीचे मुख्यप्रर्वतक संतोष खटके यांनी सांगितले. 

        विजयादशमीच्या मुहूर्तावर  गोखळी , ता.फलटण , जि. सातारा येथे या कंपनीच्या  रजिस्टर्ड  माहिती  पत्रकाचे औपचारिक अनावरण जिल्हा परिषदेच्या सदस्या सौ.उषादेवी गावडे यांचे सह प्रमुख मान्यवरांचे हस्ते गोखळी  गावाचे ग्रामदैवत श्री दक्षिणमुखी हनुमान मंदिर, येथे करण्यात आले. यावेळी श्री. खटके बोलत होते.  

        कार्यक्रमास कंपनीचे व्हाईस चेअरमन बजरंग खोमणे,   कंपनीचे  चेअरमन श्री बजरंग बबनराव खोमणे,सातारा जिल्हा परिषद च्या सदस्य सौ उषादेवी विश्वास गावडे, कृषी उत्पन्न बाजार समिती चे सदस्य श्री बबन  खोमणे, दुधसागरचे माजी अध्यक्ष दत्तोबा गावडे, पी.आर.अॅग्रोचे संचालक  कल्याणराव , पाटील,   सानंसा इंड्स्टिजचे संचालक  संदीप  पारख , शरद विकास सोसायटीचे संचालक अॅड अजय खोमणे , तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष माजी सरपंच  मनोज गावडे, सगर पतसंस्थेचे सचिव दत्तात्रय एकाड, राजु धुमाळ आदी मान्यंवर उपस्थित  होते.

No comments