Breaking News

शेरेशिंदेवाडी येथे बैलगाडी शर्यती : बैल, बैलगाडी व पिकअप जप्त ; तिघांवर गुन्हा दाखल

शेरेशिंदेवाडी येथे बैलगाडी शर्यत प्रकरणी गुन्हा दाखल  Filed a case in a bullock cart race case at Shereshindewadi
        फलटण दि. 25 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा)  - शासनाची बैलगाडी शर्यतीस बंदी असताना,  बुधणारवाडी, शेरेशिंदेवाडी ता. फलटण येथे बैलगाडी शर्यत आयोजित करण्यात आली होती.  पोलिसांना खबर मिळताच तात्काळ त्या ठिकाणी जाऊन, शर्यतीत भाग घेतलेल्या 2 बैल, बैलगाडी व पिकअप असे साहित्य जप्त करून, बैलगाडी शर्यत प्रकरणी  तीन जणांच्या विरुद्ध प्राण्यांचा छळ प्रतिबंधक अधिनियम व भादविस अंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की, बुधणारवाडी ता. फलटण गावचे हद्दीत बैलांची शर्यती पैजेवर चालु आहेत, अशी खबर मिळताच, पोलिस दोन पंचासह बुधणारवाडी  येथे  11.15 वा सुमारास गेले.  त्याठिकाणी बुधणारवाडी, शेरेशिंदेवाडी ता. फलटण गावचे हद्दीत बैलांची शर्यत चालु असल्याचे दिसले, त्याठिकाणी एका बैलांचे शर्यतीचे गाडीस दोन बैल जुंपलेले होते,  त्यावरील चालक यास त्यांचे नाव गाव विचारता त्यांने त्यांचे नाव सुरज विठठल सोनवलकर वय 19 वर्षे रा.दुधेवावी ता फलटण असे नाव सांगीतले. त्यांना सदरचे बैल कोणाचे आहेत असे विचारले असता, त्यांने सदरचे बैल हे विकास वसंत चांगण रा.सासकल ता. फलटण व संकेत सोमनाथ वावरे रा. दुधेवाबी ता. फलटण यांचे असल्याचे सांगीतले. तसेच शेजारीच पिकअप गाडी उभी होती होती. तीचा नंबर पाहता एम.एच.42 एम 9048 असा होता व याच पिकअप गाडीतुन आम्ही या ठिकाणी बैलांची शर्यत करणेसाठी आलो आहोत असे सांगीतले.  त्याठिकाणी दुसरी असणारी शर्यतीचे गाडी तेथुन बैलासह पळुन गेली, त्यांच्या बाबत पोलिसांनी माहीती विचारली असता, पोलिसांना माहिती मिळाली नाही. त्यांनतर पोलिसांनी दोन्ही बैल, बैलगाडीचे शर्यतीचे गाडी,व एम.एच.42 एम. 9048 ही पिकअप गाडी दोन पंचासमक्ष ताब्यात घेतली.
        दि.24 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11.15 वा सुमारास सुरज विठठल सोनवलकर वय 19 वर्षे रा.दुधेबावी ता. फलटण विकास वसंत चांगण रा.सासकल ता फलटण व संकेत सोमनाथ वावरे रा. दुधेबावी ता. फलटण यांनी त्यांच्यासोबत असणाऱ्या पिकअप गाडीनंबर एम.एच.42 एम 9048 या मधुन स्वतःचे मालकीचे शर्यतीचे दोन बैल  बुधणारवाडी, शेरे शिंदेवाडी ता. फलटण येथे नेऊन, महाराष्ट्र शासनाची बैलगाडी शर्यतीस बंदी असताना, त्याठिकाणी बैलांना पळवुन बैलांचा छळ केला असल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 

 

No comments