 |
श्री विठ्ठल गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास |
पंढरपूर (गंधवार्ता वृत्तसेवा) - विजयादशमी निमित्त दशमीच्या पूर्वसंध्येला पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास करण्यात आली आहे, त्यामुळे श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात मनमोहक स्वरूप प्राप्त झाले असल्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
 |
श्री रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास
|
झेंडू व कामिनी या फुला व पानांपासून श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्याला आकर्षक आरास करण्यात आली आहे, सदर फुलांची आरास श्रीराम जांभूळकर पुणे यांच्यावतीने करण्यात आली असून, फुलांची आरास सजावट विठ्ठल रुक्मिणी कर्मचारी वृंद पंढरपूर यांनी केली आहे.
 |
श्री विठ्ठल गाभाऱ्यात फुलांची आकर्षक आरास |
No comments