Breaking News

बनावट एफडी पावती देऊन 71 लाख रुपयांची फसवणूक

        फलटण दि. 28 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - स्टेट बँक ऑफ इंडिया फलटण च्या पाठीमागे असणाऱ्या  ग्राहक सेवा केंद्रात अजय कुलकर्णी याने, ग्राहकांनी फिक्स डिपॉझिट साठी दिलेले 71 लाख रुपये, एफडी ची बनावट पावती ग्राहकांना देऊन फसवणूक करून, ग्राहकांना 71 लाख रुपयांचा गंडा घातला आहे. पोलिसांनी आरोपीस अटक केली असून, आरोपी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली आहे.

        फलटण शहर पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, अजय शरद कुलकर्णी वय 48 वर्ष  रा. राहणार अक्षत प्लाजा, लक्ष्मीनगर, फलटण  हे  स्टेट बँक ऑफ इंडिया फलटणच्या पाठीमागे  ग्राहक सेवा केंद्र चालवतात. या ग्राहक केंद्रामध्ये दि.27 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी 3.15 ते 4.15 वा. चे दरम्यान  फिर्यादी सुरेश किसन झांजुर्णे वय 58 वर्षे रा. नांदल ता. फलटण जिल्हा सातारा यांनी त्यांच्या व पत्नीच्या नावे असे 20 लाख रुपये फिक्स डिपॉझिट ठेवले असता, आरोपी अजय शरद कुलकर्णी राहणार लक्ष्मीनगर फलटण याने स्वतःच्या फायद्याकरता  स्वतःच्या ग्राहक सेवा केंद्रामध्ये   बनावट एफडी पावती करून २० लाख रुपये स्वतःच्या  खात्यामध्ये जमा केले. फिर्यादी सुरेश व त्यांच्या पत्नी सौ राजश्री यांची वीस लाख रुपयांची फसवणूक केली आहे.  तसेच फिर्यादी सुरेश किसन झांजुर्णे  यांचे मित्र व साक्षीदार नामे १)  चित्रसेन यशवंत घाटगे  - १४ लाख रुपये २) बबन विष्णू शिंदे - २० लाख रुपये ३) आप्पासो पर्बती बोबडे  - १७ लाख रुपये यांची  एसटी महामंडळातून  निवृत्त झाल्यानंतरची रक्कम, आरोपी कुलकर्णी यांच्याकडे स्टेट बँकेच्या मागे ग्राहक सेवा केंद्रामध्ये एफ.डी. करण्याकरीता दिली असता, आरोपी कुलकर्णी याने, एफडी ची खोटी पावती देवून, सदर रक्कम स्वतःच्या खात्यावर जमा केली आहे. व स्वतःच्या फायद्याकरीता वापरली आहे. सुरेश किसन झांजुर्णे व त्यांचे मित्र आणि साक्षीदार यांची एकूण मिळून 71 लाख रुपयांची फसवणूक कुलकर्णी याने केली अशी फिर्याद सुरेश किसन झांजुर्णे  यांनी दिली आहे.

        गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस निरीक्षक प्रताप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक विशाल  भंडारे हे करीत आहेत. यातील फिर्यादी सुरेश किसन झांजुर्णे यांचे २० लाख रुपये काल रोजी निदर्शनास आल्यानंतर हस्तगत करुन बॅंकेने फिर्यादीच्या खात्यावर वर्ग केले आहेत. राहीलेले साक्षीदारांची  ५१ लाख रुपये रक्कम आरोपिकडून हस्तगत करावयाची आहे.
सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की ज्या लोकांनी अजय कुलकर्णी ग्राहक सेवा केंद्र स्टेट बँकेच्या पाठीमागे यांच्याकडे एफ डी केलेली आहे. त्यांनी  त्याबाबत संबंधित बँकेत खात्यावर  एफडी जमा आहे काय, याबाबत  खात्री करावी व  एफडी जमा नसल्यास  फलटण शहर पोलीस ठाण्याची संपर्क करावा असे आवाहन फलटण शहर पोलीस ठाण्याच्या वतीने करण्यात आले आहे.

No comments