Breaking News

मोबाईलच्या माध्यमातून 1 लाख 38 हजार रुपयांची फसवणूक

Fraud of Rs 1 lakh 38 thousand through mobile

        फलटण दि. 30 ऑक्टोबर  (गंधवार्ता वृत्तसेवा) - मोबाईलवर आलेला 559 रुपयांचा क्लेम कॅश करत असताना उलट मोबाईल धारकाचेच 559 रुपये कट झाल्याने, मोबाईल धारकाने हेल्पलाईन नंबर वर  संपर्क केला असता, एनी डेस्क Any Desk या मोबाईल ॲपच्या माध्यमातून अज्ञात इसमाकडून, सांगवी ता. फलटण येथील व्यक्तीची 1 लाख 38 हजार  रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. 

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, दि 27/10/2020 रोजी रात्रौ 11.00 ते दि 28/10/2020 रोजी 08.00 वा चे दरम्यान प्रथमेश बाळू वाघमोडे वय 18 वर्षे, रा सांगवी ता फलटण जि. सातारा, हा त्याच्या घरी आपल्या मोबाईलवर क्रोम ॲप वर गाणी डाऊनलोड करीत असताना, त्याला 559 रुपयांचा मोबाईल क्लेम आला. त्यावेळी प्रथमेश ने  559 रुपये क्लेमवर क्लिक केले, त्यावेळी 559 रुपये क्लेम न होता उलट प्रथमेशचेच  बँक अकाऊंटमधुन 559 रुपये कट झाले. त्यावेळी त्याने गुगल वर फोन पे हेल्पलाईन नंबर सर्च केला असता, त्याला मोबाईल क्र 9163302836 व 9007669116 हे नंबर आल्याने, प्रथमेश याने त्या मोबाईल नंबरवर फोन केला, त्यांनी प्रथमेश ला  ANY DESK हे ॲप डाऊनलोड करा, तुम्हाला तुमचे 559 रुपये परत मिऴतील, असे सांगितले. म्हणुन प्रथमेश ने ANY DESK हे ॲप डाऊनलोड केले. त्यावेळी प्रथमेश कडून ANY DESK वरुन 9 अंकी नंबर घेतला व त्याला बोलण्यात व्यस्त ठेवले व त्याचे युनियन बँक ऑफ इंडिया मधील अकाऊंटमधुन वेळोवेळी 559/- रुपये, 60,312/- रुपये, 60,312/-रुपये,16,386/- रुपये,559/- रुपये असे एकुण 1,38128/- रुपये कट करण्यात आले आहेत. कोणीतरी अज्ञात इसमाने मोबाईलच्या माध्यमातून 1 लाख 38 हजार 128 रुपयांची फसवणूक केली असल्याची फिर्याद प्रथमेश बाळू वाघमोडे यांनी फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

No comments