Breaking News

केस गळती कशी थांबवावी? रविना टंडनचा आयुर्वेदिक उपाय

        केस गळती कशी थांबवावी How to prevent hair loss? असा प्रश्न बहुतांश व्यक्तींना पडत असतो, या समस्येबाबत प्रसिद्ध अभिनेत्री रविना टंडन यांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंट वर केस गळती कशी थांबवावी याच्यावर आयुर्वेदिक उपाय सांगितला आहे.

        अभिनेत्री रवीना टंडन सोशल मीडियावर आपल्या चाहत्यांसाठी ब्युटी टिप्स देत असते. आताही तिने इंस्टाग्राम वर व्हिडीओ शेअर केला आहे. त्यामध्ये  केसगळती होण्यामागील कारणे आणि ही समस्या दूर करण्यासाठी घरगुती - नैसर्गिक उपाय देखील तिनं सांगितला आहे. व्हिडीओ मध्ये ती सांगते की,
        सध्या बऱ्याच लोकांकडून मी केसगळती बद्दल तक्रारी ऐकत आहे. यामागील कारणे अनेक असू शकतात. ताण- तणाव, चुकीचं शॅम्पू, पाण्यातील रसायने इत्यादी कारणे असू शकतात.  केस मजबूत राहण्यासाठी आवळा हा एक उत्तम उपाय आहे. आवळा आपल्या केसांसाठी पोषक आहे. केस पातळ होत असल्यास किंवा गळत असल्यास नियमित काही प्रमाणात आवळ्यांचे सेवन करावे किंवा आवळा टाळूवर लावावा.

​केस गळती थांबवण्यासाठी आवळ्याचा हेअर पॅक (Amla hair pack for stop hair loss)
एक कप दुधामध्ये जवळपास सहा आवळे उकळून घ्या.
आवळे मऊ होईपर्यंत दूध गरम होऊ द्यावे.
यानंतर आवळे शिजल्यानंतर मॅश करून घ्या.
मॅश केलेले आवळे आपल्या टाळू आणि केसांच्या मुळांना चांगल्या पद्धतीने लावा.
१५ मिनिटांनंतर केस कोमट पाण्याने धुऊन घ्या.
यानंतर केसांना शॅम्पू लावे नये.
कारण आवळ्यातील घटक केसांमध्ये जमा झालेली घाण, दुर्गंध स्वच्छ करण्यास मदत करतात.

No comments