Breaking News

जेम्स बाँड : सीन कॉनेरी यांची एक्झिट

        गंधवार्ता वृत्तसेवा - हॉलीवूड चित्रपटांमध्ये मध्ये जेम्स बॉन्डचे पात्र साकारलेले  सीन कॉनरी यांचे वयाच्या 90 व्या वर्षी निधन झाले. मुलगा जेसन कॉनरी यांनी त्यांच्या निधनाची बातमी जाहीर केली.  जेसन म्हणाले की, कॉनरी गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. रात्री झोपेतच त्यांचा मृत्यू झाला.

         सीन कॉनेरी यांना १९५६ मध्ये बीबीसी प्रॉडक्शनच्या सिनेमात कास्ट करण्यात आलं होतं. या एका संधीनंतर, त्यांनी कधीही मागे वळून पाहिलं नाही. सीन कॉनेरी यांनी अभिनेत्री डियान क्लिंटोशी लग्न केलं. त्यानंतर १९७६ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यानंतर सीन कॉनेरी यांनी दुसरं लग्न केलं होतं

         जेम्स बाँडची भूमिका साकारणारा सीन पहिले अभिनेते होते. त्यांनी 007 मालिकेतील 7 चित्रपटांत जेम्स बॉन्डची भूमिका निभावली होती. यामध्ये 'डॉक्टर नो', 'फ्रॉम रशिया विद लव', 'गोल्डफिंगर', 'थंडरबॉल','यू ओनली लिव ट्वाइस', 'डायमंड्स अरे फॉरएवर', 'नेवर से अगेन' इत्यादींचा समावेश आहे. सीन कॉनरी यांनी बॉन्ड सीरीजच्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळाली.
 
        40 वर्षांपर्यंत चित्रपटसृष्टीत सक्रिय राहणाऱ्या कॉनरी यांनी मरीन(1964), मर्डर ऑन द ओरिएंट एक्सप्रेस (1974), द मैन हु वुल्ड बी किंग(1975), द नेम ऑफ़ द रोज (1986), हाईलैंडर(1986), इंडियाना जोन्स एंड द लास्ट क्रुसेड(1989), द हंट फॉर रेड अक्टूबर(1990), ड्रेगनहार्ट (1996), द रॉक (1996), एंड फाइंडिंग फोरेस्टर (2000) या चित्रपटांत देखील काम केले आहे

No comments