Breaking News

फलटण मध्ये झेंडू फुले 250 रुपये किलो

        फलटण दि. 24  (गंधवार्ता वृत्तसेवा) - कोरोना प्रादुर्भाव  तसेच अतिवृष्टी व पूर परिस्थिती या पार्श्वभूमीवर झेंडूची फुले महागली असून, सकाळी शंभर ते दीडशे रुपये प्रति कोलो असणारा भाव संध्याकाळ होता होता अडीचशे रुपयांवर गेला.

        दसरा या सणाला व्यवसायासह, घरामध्ये पूजा  आणि पुष्पहारांच्यासाठी  झेंडू फुलांचा वापर  होत असतो, त्यामुळे या सणाला  झेंडू फुलला मोठी मागणी असते. कोरोना प्रादुर्भावामुळे  सर्व  सण-उत्सव साध्या पद्धतीने साजरे होत असले तरी, आज झेंडूच्या फुलांना बाजारपेठेत मागणी वाढल्याचे दिसून आले. कोरोना प्रादुर्भाव  तसेच अतिवृष्टी व पूर परिस्थिती या पार्श्वभूमीवर झेंडू फुलांची आवक बाजारपेठेत कमी झाली होती, त्यामुळे झेंडूचे भाव वाढलेले दिसले.  सकाळपासून 100 रुपये ते 150 रुपयांपर्यंत असणारा दर संध्याकाळी 200 ते 250 रुपयांपर्यंत पोचला होता. तर आपट्याची पाने 10 ते 20 रुपये पेंडी असा होता.

No comments