Breaking News

पाऊस सुरु असे पर्यंत पंचनामे सुरूच ठेवावेत - पालकमंत्री बाळासाहेब पाटील

आढावा बैठकीत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील


सातारा जिल्ह्यात पावसामुळे 22 हजार हेक्टर पेक्षा अधिक कृषी क्षेत्र बाधित        

Punchnama should continue till it starts raining - Guardian Minister Balasaheb Patil gave the order
        सातारा : दि. 26 - : जिल्ह्यात मागच्या काही दिवसात कमी दाबाच्या पट्यामुळे पडलेल्या पावसामुळे 22585.89 हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील पीक बाधित झाले आहे. तर ज्यांची क्षेत्र बाधित झालेली आहेत त्यांची संख्या 89041 एवढी आहे. तथापि अजून पाऊस थांबलेला नाही, त्यामुळे पाऊस सुरु असे पर्यंत पंचनामे सुरु ठेवा, असे आदेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिले.

            विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी गृहराज्य मंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रीनिवास पाटील,आ. मकरंद पाटील, आ. दिपक चव्हाण, आ. महेश शिंदे, जिल्हाधिकारी शेखर सिंह,  जि.प. कार्यकारी अधिकारी विनयकुमार गौडा, संबंधित विभागाचे अधिकारी यावेळी उपस्थितीत होते.

              अतिवृष्टीने नुकसान झालेले क्षेत्र :  सातारा तालुक्यातील एकूण 1109.72 हेक्टर क्षेत्र, कोरेगाव तालुक्यातील एकूण 503.20 हेक्टर क्षेत्र, खटाव तालुक्यातील एकूण 2994.71 हेक्टर क्षेत्र, फलटण तालुक्यातील 3765.05 हेक्टर क्षेत्र, माण तालुक्यातील 9298.26   हेक्टर क्षेत्र, वाई तालुक्यातील  567.57 हेक्टर क्षेत्र, जावली तालुक्यातील 435.60 हेक्टर क्षेत्र, खंडाळा तालुक्यातील 232.78 हेक्टर क्षेत्र, महाबळेश्वर तालुक्यातील 564.02 हेक्टर क्षेत्र, कराड तालुक्यातील 1048.95 हेक्टर क्षेत्र, पाटण तालुक्यातील 2066.03 हेक्टर क्षेत्र असे एकूण  22585.89  हेक्टर एवढ्या क्षेत्रावरील पीक बाधित झाली आहेत आहे.

            तसेच अतिवृष्टीमुळे मालमत्तांचे  नुकसान झालेली असून  यामध्ये रस्ते व मोऱ्या दुरुस्ती 470 कामे, नळ पाणी पुरवठा योजना दुरुस्ती 45 कामे, प्राथमिक आरोग्य केंद्र पुळकोटी वीज पडल्याने स्लॅबचे दुरुस्ती 1 काम, स्मशानभूमी कट्टा/निवारा दुरुस्ती 17 कामे, इमारतीस तडे गेल्याने दुरुस्ती, पत्रा व दरवाजे दुरुस्ती 17 कामे, बंधारे दुरुस्ती 40 कामे, शाळा इमारतीस तडे गेल्याने दुरुस्तीची 3 कामे असे एकूण 590 नुकसान झालेल्या कामांची संख्या आहे. यांची दुरुस्ती करायची आहे.

            अतिवृष्टीमुळे एकूण  105 गावातील खंडीत झालेला विजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे. यामध्ये वडूज येथील 48 गावे व फलटण येथील 57 गावातील विजपुरवठा सुरळीत करण्यात आलेला आहे.

        65 मिमी पेक्षा जास्त पाऊस झालेल्या बाधित क्षेत्राला नुकसान भरपाई मिळते, पण अनेक ठिकाणी त्या पेक्षा कमी पाऊस होऊनही नुकसान झाले आहे,  त्याबाबतीत शासनाला अवगत करावे अशी मागणी सर्व आमदारांनी पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे यावेळी केली.

No comments