Breaking News

ना. रामदास आठवले यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह

Minister Ramdas Athavale's covid test positive
            गंधवार्ता वृत्तसेवा (दि. 27 ऑक्टोबर 2020) -  केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांची कोविड 19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. लक्षणे दिसल्यामुळे त्यांनी स्वतःची covid-19 ची चाचणी करून घेतली, ती चाचणी पॉझिटिव्ह आली असल्याची माहिती ना. रामदास आठवले यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सध्या ते डॉक्‍टरांच्या सल्ल्याने रुग्णालयात दाखल असून संपर्कात आलेल्या व्यक्तींनी  कोविड चाचणी करून घेण्याचे आवाहन ना. आठवले यांनी केले आहे.

        केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,  माझी कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. खबरदारी चा उपाय म्हणून रुग्णालयात दाखल होण्याचा वैद्यकीय सल्ला पाळणार आहे. या दरम्यान  माझ्या संपर्कात आलेल्यांनी  खबरदारी म्हणून आपली कोरोना चाचणी करून घ्यावी. प्रकृती चांगली आहे. काळजी नसावी. सध्याचे नोयोजित कार्यक्रम रद्द केले आहेत.

        ना. रामदास आठवले यांनी नुकतीच पुणे, सातारा व सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टी व पूरग्रस्त भागाचा दौरा करून तेथील नुकसानीची पाहणी केली होती त्याच बरोबर ते तामिळनाडू राज्यात देखील गेले होते. काल ना. रामदास आठवले यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये अभिनेत्री पायल घोष यांनी रिपब्लिकन पार्टीत  प्रवेश केला आहे. त्यामुळे जे संपर्कात आले होते त्यांनी आपली कोरोना चाचणी करून घ्यावी असे आवाहन ना. आठवले यांनी केले आहे.

No comments