Breaking News

ताथवडा येथून मुऱ्हा जातीची म्हैस चोरीस

Murha buffalo stolen from Tathawada

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  मौजे ताथवडा तालुका फलटण येथे खुंटीला बांधून ठेवलेली मुऱ्हा जातीची म्हैस ढवळ येथील ती जणांनी चोरुन नेली असल्याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सावता राजाराम गार्डे रा.ढवळ ता.फलटण जि.सातारा यांनी,  दिनांक २४/१०/२०२० रोजीचे सायंकाळी ६.०० ते २५/१०/२०२० रोजीचे सकाळी १०.०० वा. चे दरम्यान मौजे ताथवडा ता.फलटण गावचे हृद्दीत जमीन गट नं ३९६ मध्ये ६०,०००/- रु.किंमतीची काळया रंगाची मुऱ्हा क्रॉस जातीची ९ वर्षे वयाची ८ महिन्याची गाभण असलेली म्हैस  खुंटी ठोकुन बांधून ठेवली होती.  ती बांधलेली म्हैस, १) गजानन भगवान जाधव २) प्रताप संजय सुतार ३)नितीन रघुनाथ जाधव ४) मयुर धनाजी रिटे सर्व रा. ढवळ ता.फलटण जि.सातारा  यांनी चोरुन नेली असलेचा संशय असल्याची फिर्याद सावता राजाराम गार्डे यांनी दिली आहे. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस नाईक एस. एम. तुपे करीत आहेत.

No comments