Breaking News

बडेखान, काळज येथे सापडलेल्या युवतीला फलटण निर्भया पथकाने केले घरपोहोच

हाणू पोलिस स्टेशन येथे सापडलेली युवती, आज्जी, आजोबा यांच्यासह फलटण निर्भया पथक
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - बडेखान, काळज ता. फलटण येथे रडत बसलेल्या 18 ते 19 वयोगटातील युवतीला, रूपाली नबाजी जाधव, प्रदीप झणझणे, महेंद्र घाडगे यांच्या दक्षतेने व मदतीमुळे, फलटण निर्भया पथकाने डहाणू जिल्हा पालघर येथे त्या मुलीच्या नातेवाईकांकडे सुखरूप पोहोच केले.  
        दि. 20 ऑक्टोबर 2020  रोजी सायंकाळच्या सुमारास बडेखान, काळज ता. फलटण बस स्थानकावर एक 18 ते 19 वयोगटातील मुलगी रडत बसलेली, रूपाली नबाजी जाधव राहणार घाडगेमळा यांना दिसून आली. तिला काहीतरी अडचण असावी हे त्यांच्या लक्षात आले,  नंतर त्यांनी सामाजिक बांधिलकी जपत सदर मुलीचे जवळ जाऊन तिच्याकडे विचारपूस केली असता, तिने आपले नाव सरिता विष्णू गहला राहणार आशागड डहाणू जिल्हा पालघर असे, सांगून मला माझे घरी जायचे आहे,  असे सांगितले. रुपाली जाधव यांनी रात्रीची वेळ असल्याने, सदर मुलीस त्या दिवशी आपल्या घरी ठेवून, दुसऱ्या दिवशी त्यांनी व शिवसेना तालुकाध्यक्ष प्रदीप झणझणे, महेंद्र घाडगे यांनी सदर मुलीस उपविभागीय पोलिस अधिकारी श्री.  तानाजी बरडे यांना भेटून, वरील हकीकत सांगितली. उपविभागीय पोलिस अधिकारी श्री बरडे यांनी सदर मुलीच्या सुरक्षितेच्या दृष्टीने तात्काळ निर्भया पथक फलटण डिव्हिजन, यांना बोलावून घेऊन'  सदर मुलीची पूर्ण माहिती घेऊन तिला तिचे नातेवाइकांचे ताब्यात देण्याबाबत आदेश दिले. 

        निर्भया पथक यांनी उपविभागीय पोलिस अधिकारी यांचे मार्गदर्शनाखाली  पीएसआय भंडारे, महिला पोलीस हेडकॉन्स्टेबल वैभवी भोसले, महिला पोलीस नाईक सविता अगम, पोलीस नाईक संदीप मदने यांनी सदर मुलीची संपूर्ण माहिती घेऊन, दि. 22 ऑक्टोबर 2020 तारीख रोजी डहाणू जिल्हा पालघर येथे जाऊन, सदर मुलीस तिची आजी लक्ष्मी गणपत गिंबल यांच्याकडे सुखरूप ताब्यात दिली. सदरची मुलगी ही मतिमंद असून तिचे आई वडील मयत झाल्याने तिचा सांभाळ तिची आजी करत होती.  सदरची मुलगी ही चार महिन्यापासून बेपत्ता होती परंतु घरची परिस्थिती हालाखीची व आजी वयोवृद्ध असल्याने तिची तक्रार व शोध घेऊ शकल्या नाहीत, परंतु आपली नात मिळून आल्या नंतर मुलीचे आजी आजोबा यांनी निर्भया टीमचे आभार मानले व सदरची मुलगी तिच्या घरी सुरक्षित पोहोचली.

No comments