Breaking News

शिवभोजन थाळीचा दर पुढील सहा महिन्यांसाठी ५ रुपये

The price of Shivbhojan Thali is Rs 5 for the next six months

         मंत्रिमंडळ निर्णय : दि. २९ ऑक्टोबर २०२० - शिवभोजन थाळीचा दर 31 मार्च 2021 पर्यंत 5 रुपये एवढा करण्याचा निर्णय आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.

        कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर 1 ऑक्टोबरपासून पुढील 6 महिन्यासाठी हा दर लागू राहील.  जानेवारी 2020 पासून 10 रुपये एवढ्या दराने शिवभोजन थाळी उपलब्ध करून देण्यात येत होती.  कोरोनामुळे मार्चपासून या थाळीची किंमत 5 रुपये एवढी करण्यात आली.  सध्या एकूण 906 शिवभोजन केंद्रांमधून थाळ्यांचे वितरण होते.  ही योजना सुरु झाल्यापासून आतापर्यंत सुमारे 2 कोटी थाळ्या वितरित करण्यात आल्या आहेत.

No comments