Breaking News

लायन्स क्लब फलटण गोल्डनचे सेवाकार्य प्रेरणादायी - लायन प्रशांत साळुंखे

 झोन चेअरमन ला.प्रशांत साळुंखे यांचे हस्ते ऑक्सि मीटर व ऑक्सि किट देताना. डावीकडून ला.मंगल घाडगे, ला.नीलम पाटील, ला.उज्वला निंबाळकर, ला.प्रशांत साळुंखे, ला.बापू जगताप व ला.अर्जुन घाडगे
        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - छत्रपती शिवाजी महाराजांचे काळातील हिरोजी इंदुलकर यांनी अनेक किल्ले बांधण्याची सेवा केली. हे काम त्यांनी कोणत्याही मोबदल्यासाठी न करता मोठ्या निष्ठेने सेवाकार्य म्हणून केले. त्याच पद्धतीने लायन्स क्लब फलटण गोल्डन निस्वार्थीपणे सेवाकार्य करत आहेत. त्यांचे हे सेवाकार्य इतरांना प्रेरणादायी असल्याचे गौरवोद्गार, लायन्स क्लब झोन चेअरमन लायन प्रशांत साळुंखे यांनी काढले. 

        ‘लायन्स क्लब फलटण गोल्डन’ च्या अध्यक्षपदी लायन्स सौ.उज्वला निंबाळकर यांची एक वर्षासाठी एकमताने फेर निवड करण्यात आली. त्यानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी लायन साळुंखे बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी लायन्स सौ.उज्वला निंबाळकर उपस्थित होत्या. कार्यक्रमास लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन बापू जगताप, सचिव लायन महेश साळुंखे, खजिनदार लायन विवेक गायकवाड यांची उपस्थिती होती. 

        यावेळी झोन चेअरमन लायन प्रशांत साळुंखे यांचे हस्ते लायन्स मुधोजी आय हॉस्पिटलचे पेशंटसचे बेड्साठी बेडशीट्स व पल्स ऑक्सीमीटर अध्यक्ष लायन्स उज्वला निंबाळकर यांचे सौजन्याने हॉस्पिटलचे अध्यक्ष लायन अर्जुन घाडगे यांचेकडे सुपुर्द करण्यात आले. तसेच गोल्डन क्लबमार्फत कोरोना रुग्णांसाठी गरजेनुसार आवश्यक असणारे ऑक्सीजन कीट सुरज रणजित निंबाळकर यांचे सौजन्याने मोफत उपलब्ध केले आहे व झोन चेअरमन लायन प्रशांत साळुंखे यांचे हस्ते लायन अर्जुन घाडगे यांचेकडे सुपुर्द केले आहे. 

        अध्यक्षीय भाषणात लायन्स उज्वला निंबाळकर यांनी सेवाकार्य करत असताना ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांचेबद्दल ऋण व्यक्त करुन सर्व सदस्यांचे सहकार्याबद्दल आभार मानले. 

        कार्यक्रमाचे प्रास्ताविक लायन्स सुनीता कदम यांनी केले. सचिव अहवाल लायन्स निलम पाटील, खजिनदार अहवाल लायन्स मंगल घाडगे यांनी सादर केला. प्रमुख पाहुण्यांचा परिचय लायन नेहा व्होरा यांनी करुन दिला. 

लायन प्रशांत साळुंखे यांचे हस्ते गोल्डन क्लबमध्ये लायन्स प्रा.निलम देशमुख, लायन्स मयुरी करवा, लायन्स डॉ.सीता जगताप व लायन्स प्रा.धनश्री भोईटे या चार नूतन सदस्यांचे स्वागत करण्यात आले. 


No comments