Breaking News

राज्याचे कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर

        The state's corona patient recovery rate is 90 per cent
        मुंबई - राज्याचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले असून आज गेल्या तीन महिन्यातील सर्वात कमी नवीन रुग्ण आढळून आले आहेत.

        काल ९,९०५ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण १४,७०,६६० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८९.२ % एवढे झाले आहे.
काल राज्यात ३,६४५ नवीन रुग्णांचे निदान.
    राज्यात काल ८४ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. सध्या राज्यातील मृत्यूदर २.६३ % एवढा आहे.
आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८६,४५,१९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६,४८,६६५ (१९.०७ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
सध्या राज्यात २५,३०,९०० व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर १३,६९० व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
 
राज्यात एकूण १,३४,१३७ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत.

No comments