Breaking News

ऊसतोड मजुरांना घरात घुसून मारहाण

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) -  मौजे शिंदेनगर तालुका फलटण येथे पिकअप गाडीला धक्का देऊनही गाडी सुरू झाली नाही म्हणून गाडीला धक्का देणाऱ्या ऊसतोड मजुरांना शिंदेवाडी तालुका माळशिरस जिल्हा सोलापुर येथील तीन जणांनी घरात घुसून मारहाण केली असल्याबाबतचा गुन्हा फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनला नोंद करण्यात आला आहे.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार सतीलाल रतन माळवे मुळ रा. फरासनेल ता.शिरपुर जि.धुळे सध्या रा शिंदेनगर ता.फलटण जि. सातारा हे इतर ऊसतोड मजुरांसह दिनांक 27 ऑक्टोबर 2020 रोजी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास मौजे शिंदेनगर तालुका फलटण रस्त्याने ऊसाचा ट्रक्टर भरुन त्यांचे पालाकडे घरी जात असताना मौजे शिंदेनगर तालुका फलटण आमच्या हद्दीत निंबाळकर यांचे घराजवळ आलेवर १ पिकअप जिप बंद पडली होती व त्या जिपला १) अनिकेत संजय मसुगडे २) निखील बाळासो मदने ३) किरण शंकर काशिद सर्व रा. शिंदेवाडी ता.माळशिरस जि.सोलापुर हे धक्का देत होते. त्यांनी ट्रॅक्टर मधील ऊसतोड मजूरांना थांबवले व गाडीला धक्का देणेस बोलावले,  सतीलाल रतन माळवे व त्याचे साथीदार यांनी त्यांचे गाडीस धक्का दिला, परंतु गाडी चालु झाली नाही. म्हणुन आरोपी यांनी शिवीगाळ करुन,  पाठीमागे दगड घेवुन आले,  ऊसतोड मजूर सतीलाल रतन माळवे व त्यांचे साथीदार हे त्यांचे टोळीमालक यांचे घरात लपुन बसले, तरीही आरोपीत अनिकेत मसुगडे, निखिल मदने,  किरण काशीद यांनी टोळी मालकाचे घरात घुसुन त्यांना मारहाण केली असल्याची फिर्याद सतीलाल रतन माळवे यांनी ग्रामीण पोलीस स्टेशनला दिली आहे.

गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हवालदार एमआर हांगे करीत आहेत.

No comments