Breaking News

फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला अध्यक्षपदी सुजाता गायकवाड

Sujata Gaikwad as the Women President of Phaltan Taluka National Congress

        फलटण - फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्या महिला तालुका अध्यक्षपदी वाठार गिरवी गटाच्या माजी जिल्हा परिषद सदस्या सौ.सुजाता सुनिल गायकवाड (तावडी) यांची जिल्हा काँग्रेस कमिटी सातारा येथे झालेल्या बैठकीत जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, महिला काँग्रेसच्या प्रदेश सरचिटणीस सौ.रजनी ताई पवार, महिला जिल्हाध्यक्ष सौ.धनश्री महाडिक जिल्हा काँग्रेसचे समन्वयक मा.श्री महेंद्र सूर्यवंशी बेडके यांच्या उपस्थितीत निवड करण्यात आली. या प्रसंगी पंकज पवार,शंकरराव लोखंडे, सुनिल गायकवाड,अशोक शिंदे,शरद सोनवणे व सातारा जिल्हा महिला काँग्रेस पदाधिकारी तसेच अनेक काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.  सुजाता गायकवाड यांच्या निवडीबद्दल त्यांचे अभिनंदन होत आहे.



No comments