Breaking News

अंडी घेण्यास आलेल्या दोघांनी केली वृद्धेची फसवणूक; मोहनमाळ लंपास

वडजल, फलटण येथे दोन जणांनी वृद्ध महिलेची फसवणूक केली
Two people cheated on the old woman at Vadjal, Phaltan
        फलटण दि. 26 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - अंडी घेण्याच्या बहाण्याने घराजवळ आलेल्या दोन अज्ञात इसमानी, वडजल ता. फलटण येथील श्रीमती इंदुमती ढेंबरे यांची ओळख वाढवून, तुमच्या गळ्यातील दागिन्यासारखाच दागिना आमच्या आजीला करायचा आहे, असे म्हणून  त्याचा फोटो  काढण्याच्या बहाण्याने मोहनमाळ घेऊन तेथून पळ काढला. 

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार, श्रीमती इंदुबाई नामदेव ढेंबरे वय वर्षे 86 राहणार वडजल तालुका फलटण या आज दिनांक 26 ऑक्टोबर 2020 रोजी सकाळी 11:30  वाजण्याच्या सुमारास घरात नवरात्र निमित्त बसवलेला घट शेतामध्ये टाकण्यासाठी निघाल्या असता, दोन मुले डिस्कव्हर मोटारसायकल वर आले व  त्यातील एका मुलाने इंदुमती ढेंबरे  यांना, आजी तुमच्याकडे अंडी आहेत का, असे  विचारले. त्यावर त्या म्हणाल्या, अंडी आहेत. पण मी आता रानात चालले आहे. रानातुन घरी आल्यावर देते तुम्हाला, असे म्हणून इंदुमती ढेंबरे रानात गेल्या व घटातील फूले रानात टाकली. तेवढ्यात ती दोन मुले त्यांची मोटार सायकल घेवुन जवळ आली व चला घरी, तुम्हांला गाडीवर नेहतो असे म्हणाल्यावर इंदुमती ढेंबरे  या त्यांचे गाडीवर बसल्या व  घरी आल्या. व अंडी दिली, त्या मुलांनी चौकशी करत करत, इंदुमती ढेंबरे यांना चहाची मागणी केली. चहा दिल्यावर,  त्यातील एक मुलगा, आमच्या यमुना आजीला तुमच्या गळ्यातील दागिना आहे, तसा करायचा आहे, असे म्हटला,  त्यावर इंदुमती ढेंबरे असाच दागिन्याचा फोटो काढा, असे म्हणल्या.  त्यावेळी तो त्यांना म्हणाला माळ काढा, हातात धरा मी फोटो काढुन घेतो, त्यावेळी इंदुमती ढेंबरे यांनी मोहनमाळ काढली व  हातात घरली, त्या मुलाने  मोबाईल वर फोटो काढला.  पण नंतर तो म्हणाला, फोटो काय व्यवस्थित आला नाही,  माळ माझ्याकडे द्या,  मोटार सायकल वर बसलेल्या मुलाच्या मोबाईल वर फोटो काढतो, असे म्हटला व माळ इंदुमती ढेंबरे यांच्या हातातुन घेतली आणि मोटार सायकल वर बसलेल्या मुलाच्या पाठीमागे गाडीवर बसून 1 तोळे वजनाची सोन्याची मोहनमाळ घेऊन  ते दोघे निघुन गेले.

         डिस्कव्हर कंपनीची निळ्या रंगाची मोटार सायकल त्यावर दोन मुले अंदाजे वय 25 ते 35 वयोगटाची असून, त्यातील एका मुलाचे अंगात लाल रंगाचा फुल बाह्याचा शर्ट व काळ्या रंगाची जिन्स व दुसऱ्या मुलाच्या अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट व काळ्या रंगाची पैन्ट असे पेहराव असलेल्या दोघांनी इंदुमती ढेंबरे यांच्या गळ्यातील मोहनमाळ एक तोळा वजनाची अंदाजे 15,000/- रु किंमतीची फोटो काढतो म्हणून माझ्या हातातील मोहनमाळ धेवुन गेले असल्याची फिर्याद इंदुमती ढेंबरे यांनी दिली आहे.

No comments