Breaking News

लघुशंकेला थांबला आणि मोटार सायकल गेली चोरीला

        फलटण दि. 23 ऑक्टोबर (गंधवार्ता वृत्तसेवा) - पिंप्रद ता. फलटण येथील पेट्रोल पंपाजवळ रस्त्याच्या कडेला मोटार सायकल पार्क करून, स्वार लघुशंकेला गेला असता, पाठीमागून आलेल्या मोटारसायकल वरील अनोळखी इसमाने पार्क केलेली मोटार सायकल पळवून नेली.

        फलटण ग्रामीण पोलीस स्टेशन कडून मिळालेल्या माहितीनुसार दिनांक २२/१०/२०२० रोजी रात्री ०८.१५ वा चे सुमारास पिंप्रद गावचे हद्दीत, पवार पेट्रोलपंपापुढे बरड बाजुस १०० फुट अंतरावर रस्त्याचे कडेला, वसंत गणपत आवटे वय- ४५ वर्षे व्यवसाय - ड्रायव्हर रा - बरड ता फलटण जि सातारा हे मोटार सायकल उभी करुन लघवी साठी गेले असता, पाठीमागुन तीन इसम त्यांचे मोटार सायकलवर येवुन, आवटे यांच्या मोटार सायकल जवळ थांबले, व त्यातील अनोळखी अज्ञात व्यक्तीने आवटे यांची हिरो कंपनीची एच.एफ डिलक्स काळे निळे रंगाची मोटार सायकल तिचा आर टी ओ नंबर एम एच ११ बी डब्लु ५८८६ ही मोटार सायकल संमतीशिवाय मुद्दाम लबाडीने, चोरुन नेली असल्याची फिर्याद वसंत गणपत आवटे यांनी दिली आहे.

No comments