 |
श्री विठ्ठलास पारंपारीक घोंगडी, चांदीची काठी |
पंढरपूर (गंधवार्ता वृत्तसेवा)- आज रविवार दिनांक २५/१०/२०२० रोजी अश्विन शु. ९, विजयादशमी दसरा सणानिमीत्त श्री विठ्ठलास पारंपारीक घोंगडी, चांदीची काठी तसेच श्री रूक्मिणी मातेस “सोन्याची साडी” परिधान करण्यात आली आहे. श्री विठ्ठल, श्री रूक्मिणी, श्री सत्यभामा, श्री राधिका, श्री महालक्ष्मी मातेस व श्री व्यंकटेशास विविध पारंपारीक अलंकार परीधान करण्यात आले असल्याचे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी सांगितले.
 |
श्री रूक्मिणी मातेस “सोन्याची साडी” परिधान करण्यात आली |
No comments