सातारा जिल्ह्यात 150 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 211 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 7 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 150 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 339 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
211 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 18, कराड येथील 10, कोरेगांव येथील 34, वाई येथील 15, खंडाळा येथील 8, रायगांव येथील 37, पानमळेवाडी येथील 4, मायणी येथील 10, महाबळेश्वर येथील 1, दहिवडी येथील 4, खावली येथील 3, म्हसवड येथे 24 व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 43 असे एकूण 211 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 205509
एकूण बाधित -- 47754
घरी सोडण्यात आलेले -43638
मृत्यू -- 1603
उपचारार्थ रुग्ण -- 2513
No comments