सातारा एलसीबीची कारवाई ; जुगार अड्ड्यावर छापा टाकून 2 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त
सातारा ( गंधवार्ता वृत्तसेवा ) - दि. 11 नोव्हेंबर - स्थानिक गुन्हे शाखा, सातारा (एलसीबी) यांनी सोमर्डी ता.जावली जि.सातारा येथील जुगार अडयावर छापा टाकून २,४०,७०० रुपयांचा मुद्देमाल केला जप्त करून 9 जणांना ताब्यात घेतले आहे.
गुन्ह्या संदर्भात अधिक माहिती अशी, दि.१०/११/२०२० रोजी आनंदसिंग साबळे सहायक पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, सातारा यांना सोमर्डी ता.जावली जि.सातारा येथील एक इसम त्याचे घरामध्ये जुगार अड्डा चालवित आहे, अशी गोपनिय बातमी प्राप्त झाली. त्याबाबत श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांना तात्काळ माहिती सांगून, त्यांनी दिले आदेशाप्रमाणे प्राप्त झालेल्या बातमीच्या ठिकाणी स्थानिक गुन्हे शाखा, सातारा येथील पथकाने जावून छापा टाकला असता, तेथे एकूण ९ इसम ३ पत्ती जुगार खेळत असताना, मिळून आल्याने त्यांना कारवाई कामी ताब्यात घेण्यात आले असून, त्यांचे कब्जातून रोख रक्कम, जुगार साहित्य, मोबाईल हॅन्डसेट, ३ मोटार सायकल असा एकूण २,४०,७०० रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्याबाबत मेढा पोलीस ठाणेस गुन्हा नोंद केला आहे.
श्री.अजय कुमार बंसल पोलीस अधीक्षक, सातारा व श्री.धीरज पाटील अपर पोलीस अधीक्षक, सातारा यांचे मार्गदर्शनाखाली श्री.आनंदसिंग साबळे सहायक पोलीस निरीक्षक यांचे अधिपत्याखाली पो.हवा.तानाजी माने, अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, पो.ना.प्रविण कांबळे, चा. पो.कॉ.धाडगे, मेढा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमोल माने, पो.हवा.संजय ओवाळ गजानन तोडकर यांनी सदरची कारवाई केलेली आहे.
No comments