Breaking News

सातारा जिल्ह्यात 301 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 213 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

 सातारा दि. 11 -: जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 301 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 213 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 213 जणांचे नमुने पाठविले तपासणीला

स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 11, कराड येथील 8, फलटण येथील 12, कोरेगांव येथील 10, वाई येथील 20, खंडाळा येथील 12, रायगांव येथील 14, पानमळेवाडी येथील 20, मायणी येथील 8, महाबळेश्वर येथील 5, दहिवडी येथील 19, तळमावले येथील 31, म्हसवड येथील 3 व कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 40 असे एकूण 213 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.

 *घेतलेले एकूण नमुने -212680

*एकूण बाधित -48296

*घरी सोडण्यात आलेले -44175

*मृत्यू -1626

*उपचारार्थ रुग्ण-2495

No comments