Breaking News

इस्रो कडून पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 चे यशस्वी प्रक्षेपण

       गंधवार्ता वृत्तसेवा, दि. ७ नोव्हेंबर - भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून शनिवारी रडार इमेजिंग उपग्रह EOS01ची लॉन्चिंग केली. PSLV-C49 रॉकेटद्वारे देशाच्या रडार इमेजिंग उपग्रहासोबतच 9 विदेश उपग्रह अंतराळ सोडण्यात आले. 
        ISRO चे चेअरमन डॉ. के सिवन यांनी EOS01च्या यशस्वी प्रक्षेपणावर ते म्हणाले की, दिवाळी आधीच रॉकेट लॉन्च केले, खरा उत्सव आता सुरू होईल. आम्ही वर्क फ्रॉम होममध्ये अंतराळाशी संबंधित काही गोष्टी करू शकत नाहीत. आपला प्रत्येक इंजीनिअर प्रयोगशाळेत उपस्थित असतो. जेव्हा आपण एखाद्या मोहिमेविषयी चर्चा करत तेव्हा प्रत्येक तंत्रज्ञ, कर्मचारी सोबत काम करतात.

        पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय अंतराळ संशोधन संस्था (इस्रो) आणि भारतीय अंतराळ उद्योगाचे पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल अभिनंदन केले आहे.
        पंतप्रधान म्हणाले, “पीएसएलव्ही-सी49/ईओएस-01 च्या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल मी इस्रो आणि भारतीय अंतराळ उद्योगाचे अभिनंदन करतो. कोविड-19च्या काळात आपल्या वैज्ञानिकानी सर्व आव्हानांचा सामना करत निर्धारित वेळेत ही मोहीम पूर्ण केली आहे.

        या मोहिमेत अमेरिका आणि लक्जमबर्गचे प्रत्येकी चार आणि लिथुआनियाच्या एका उपग्रहासह  नऊ उपग्रह देखील प्रक्षेपित करण्यात आले."

No comments