सातारा जिल्ह्यात 60 नागरिकांना दिला आज डिस्चार्ज; 14 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
सातारा दि. 8 : जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 60 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 14 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
14 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 9, महाबळेश्वर येथील 2, पिंपोडा येथील 3 असे एकूण 14 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहिती ही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 205774
एकूण बाधित -- 47787
घरी सोडण्यात आलेले -43698
मृत्यू -- 1610
उपचारार्थ रुग्ण -- 2479
No comments