कारच्या बोनेट वर वाहतूक पोलिसाला नेले ८०० मिटर फरफटत
पोलीस आयुक्त सो, श्री कृष्णप्रकाश व अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे यांनी आबा सावंत यांचे अभिनंदन केले |
घटनेची अधिक माहिती अशी, चिंचवड वाहतुक विभागांतर्ग येणाऱ्या अहिंसा चौक येथे विनामास्क वाहनचालकांवर पोलीस कर्मचारी पोना ८२१ आबासाहेब विजयकुमार सावंत हे कारवाई करीत असताना एम एच ०१ वाय ८८३७ या क्रमांकाची फियाट उनो वाहन चालक नामे युवराज हनुवते हे चालवत होते. तेव्हा त्यांनी मास्क घातला नव्हता. सदर वाहन चालकास सावंत यांनी थांबवण्यासाठी इशारा केला परंतु त्यांनी त्यांचेकडे जाणीवपूर्क दुर्लक्ष करुन वाहन बाजुला न करता तसेच पुढे दामटले. परंतु चालकास वाहनाचा अडथळा आल्याने त्याला पुढे निघुन जाता आले नाही. तेंव्हा सावंत यांनी वाहनाच्या पुढे जाऊन बॉनेटवर हाथ ठेवुन वाहन बाजुला घेण्यास सांगितले. परंतु तरिदेखील चालक वाहन बाजूला घेत नव्हता. चालकांनी वाहन रेस करत सावंत यांना मागे नेत वाहन रेटत होते. अशा स्थितीत सदर वाहन चालकाने चारचाकी अंदाजे ५० मिटर पर्वंत रेटली. सदर परिस्थिती पाहून त्यांचे सहकारी कर्माचारी हे त्यांच्या मदतीला आहे. त्यांनी चालकाला समजावत वाहन बाजुला घेण्यास सांगत होते. परंतु तो वाहन बाजुला घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. वाहनचालकाशी बोलत असतानाच अचानक चालकाने वाहन एक्सलरेट करुन पुढे पळविले, त्यामुळे समोर उभे असलेले पोना सावंत यांचा गुडघ्याला इजा झाली व ते बोनेटवर पडले त्यामुळे त्यांचे उजव्या गुड़ग्व्यास गंभीर दुखापत झाली. परंतु चालकाचे त्याकडे दुर्लक्ष करुन सदर फियाट उनो ही एल्प्रो कंपनी ते चाफंकर चौक मार्गे पिएन जी ज्वेलर्स पर्यंत अंदाजे ८०० मिटर पर्यंत पोना सारवंत यांना कारच्या बॉनेटवर बसलेल्या स्थितीतच वाहन पळविले. त्यादरम्यान आजुबाजुच्या लोकांनी, रिक्षा चालकांनी दुचाकी स्वारांनी सदर वाहन थांबवण्याचा प्रयत्न केला, परंतु चालक इसम हा कोणाचेही ऐकण्याच्या मनस्थितित नव्हता. तेंव्हा त्याचा पाठलाग करणा-या दोन दुचाकीस्वारांनी पुढे जाणा-या झायलो गाडीस रस्त्याच्या मध्ये थांबवुन सदर वाहनचालकास वाहन थांबविण्यात भाग पाडले. त्यानंतर पोलीसांनी त्याला ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर कारवाई केली. नमुद घटनेमध्ये पोना सांवत यांच्या जिवितास धोका निर्माण झाला होता. परंतु यांनी धाडसाने कर्तव्यदक्ष राहुन प्रसंगावधान राखुन स्वतःचा बचाव केला आहे.
पोलीस नाईक सावंत यांनी प्रसंगावधान ठेऊन पोलीस दलाचे कर्तव्याप्रती निष्ठा राखली. त्यांनी केलेल्या मनोधैर्य वाढविणा-या कामगिरिबद्दल मा. पोलीस आयुक्त सो, श्री कृष्णप्रकाश व अपर पोलीस आयुक्त श्री रामनाथ पोकळे यांनी, अभिनंदन करुन मनोधैर्य वाढवले असल्याचे श्रीकांत डिसले सहाय्यक पोलीस आयुक्त, वाहतुक शाखा पिंपरी चिंचवड यांनी कळवले आहे.
No comments