Breaking News

एकनाथ खडसे यांच्या गाडीला अपघात

        गंधवार्ता वृत्तसेवा दि. 1 नोव्हेंबर 2020 - नुकतेच भारतीय जनता पार्टीतून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले, नेते एकनाथ खडसे यांच्या चारचाकी वाहनाला अपघात झाला असून, एकनाथ खडसे यांच्यासह सर्वजण सुखरूप असल्याची माहिती एकनाथ खडसे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे.

        एकनाथ खडसे हे अमळनेरहुन जळगाव कडे येत असताना धरणगाव जवळ अचानक त्यांच्या गाडीचा टायर फुटल्यामुळे सदर चा अपघात घडला असून, चालकाच्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे,  एकनाथ खडसे यांच्या बरोबर काही कार्यकर्ते देखील होते. गाडीतील कोणालाही दुखापत झालेली नाही.
        एकनाथ खडसे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, आज अमळनेर हून जळगावकडे येतांना धरणगाव नजिक माझ्या गाडीला किरकोळ अपघात झाला. गाडी चा वेग कमी असल्याने आणी चालकाच्या प्रसंगावधाने आणी आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आम्ही सर्व सुखरूप  आहोत. कोणालाही इजा झालेली नाही.

No comments