Breaking News

फलटण येथे अवैध वाळू वाहतूक वाहनावर कारवाई

        फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - दिनांक ३/११/२०१० रोजी  फलटण- सातारा रोडवर फलटण शहर हद्दीत अनाधिकृतपणे वाळू वाहतूक करीत असलेल्या चारचाकी वाहन क्रमांक MH12- QA6174 आढळून आले असता. महसूल खात्याच्या पथकाने या अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करून, सदरचे वाहन जप्त करून पोलीस स्टेशनला जमा केले आहे.

        अवैध वाळू वाहतुकीवर करण्यात आलेली कारवाई उपविभागीय अधिकारी शिवाजीराव जगताप  यांच्या मार्गदर्शनाखाली व तहसीलदार समीर यादव  फलटण यांच्या सूचनेनुसार अनिल ठोंबरे रावसाहेब महसूल नायब तहसीलदार, श्री लक्ष्मण अहिवळे तलाठी उपळवे, श्री शीलवंत चव्हाण तलाठी हिंगणगाव, श्री योगेश  धेंडे तलाठी फलटण व वाहनचालक श्री बाळासाहेब भिसे यांच्या पथकाने केली.
 
        अवैध वाळू वाहतूक करत असलेले वाहन व एक ब्रास वाळू जप्त करून पुढील कारवाईसाठी सदरचे वाहन फलटण शहर पोलीस ठाणे या ठिकाणी जमा करण्यात आले असल्याचे या पथकाने कळवले आहे.

No comments