Breaking News

बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा! - अमृता फडणवीस

           गंधवार्ता वृत्तसेवा (दि. ४ नोव्हेंबर) - अर्नब गोस्वामी  यांना अटक झाल्यानंतर,  राजकीय नेते  तसेच सेलिब्रिटीज  सोशल मीडियावर आपल्या प्रतिक्रिया देत असून, माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी देखील अर्नब गोस्वामी यांच्या अटकेला विरोध करत, आपल्या ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले आहे. 

        अलिबाग येथील एका इंटीरिअर डिझायनरच्या आत्महत्याप्रकरणी रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अर्णब यांच्या अटकेच्या विरोधात भाजपा तसेच विरोधी पक्षांनी टीका केली आहे यामध्ये माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनीदेखील उडी घेऊन ट्विट केले आहे की, बहुत छाले है उसके पाओं में, कम्बख़्त उसूलों पे चला होगा! असे म्हणत अमृता फडणवीसांनी अर्णबला पाठिंबा देऊन, त्यांच्या अटकेला विरोध केला आहे. 


No comments