फलटणला आज श्रीराम कारखाना व नगर परिषदेच्या विरोधात आंदोलने
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) - फलटण शहरामध्ये आज 11 वाजता, श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा दोन्ही संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार व रजेचा पगार मिळण्यासाठी ॲड नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात येत आहे. तर भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते खराब झालेले आहेत, ते दुरुस्त करावेत म्हणून दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी 11 वाजता नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक व गटनेते अशोक जाधव यांनी कळविले आहे.
श्रीराम सहकारी साखर कारखाना लि.फलटण व नीरा व्हेली अर्कशाळा या दोन्ही संस्थेतून निवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांची ग्रॅच्युइटीची रक्कम तसेच थकीत पगार व रजेचा पगार अशी रक्कम या दोन्ही संस्थेकडे 2 ते 3 वर्षापासून पासून थकीत आहे, दिनांक 7 नोव्हेंबर 2020 पर्यंत श्रीराम कारखान्याने रक्कम दिली नाही तर दिनांक 9 नोव्हेंबर 2020 पासून ऐन दीपावलीच्या सणात बेमुदत उपोषणास बसणार असल्याचे ॲड नरसिंह निकम यांनी कळवले होते. त्या प्रमाणे अद्याप दोन्ही संस्थांकडून कोणतीही कार्यवाही न झाल्यामुळे दि. 9 नोव्हेंबर पासून उपोषण सुरू करणार असल्याचे ॲड. नरसिंह निकम सांगितले आहे.
भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहरातील रस्ते खराब झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल होत आहेत. 7 दिवसाच्या आत रस्ते दुरुस्त झाले नाहीत तर नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करण्यात येईल असा इशारा फलटण नगरपरिषदेचे नगरसेवक अशोक जाधव यांनी निवेदनाद्वारे दिला होता, परंतु अद्याप रस्ते दुरुस्त न झाल्यामुळे दिनांक 9 नोव्हेंबर 2020 रोजी 11 वाजता नगर परिषदेसमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन करणार असल्याचे नगरसेवक व गटनेते अशोक जाधव यांनी कळविले आहे.
No comments